ब्रेकिंग! अक्कलकोटकरांना मोठी खुशखबर

Admin
1 Min Read
  • अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणाच्या वरील बाजूच्या तुळजापूर तालुका व परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच धरणक्षेत्रात अनेक गावांमध्येही जोरदार पाऊस पडल्याने अक्कलकोटचे वरदायिनी म्हणून ओळखले जाणारे कुरनूर धरण १०० टक्के भरले आहे. धरणाच्या तीन दरवाजातून पाणी सोडण्यात सुरवात झाली आहे. धरण शंभर टक्के भरल्याने पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याची समस्या दूर होणार आहे.
  • अक्कलकोट तालुक्यातील बोरी व हरणा नदीच्या संगमावर उभे असलेले कुरनूर धरण गुरुवारी ५८ टक्के इतके भरले होते. धरणाच्या वरच्या बाजूकडील धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग व तुळजापूर
  • भागात मोठा पाऊस रात्री पडला. तसेच कुरनूर, चपळगाव, हन्नूर आदी धरणग्रस्त भागातील अनेक गावातही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे दोन्ही नद्यावाटे मोठ्या प्रमाणात धरणात पाणी आले आहे. शुक्रवारी सकाळी धरण ८६ टक्के इतके भरले होते. दुपारी पावणेतीन ते तीन वाजण्याच्या सुमारास धरण १०० झाले आहे.
  1. कुरनूर धरणाची एकूण क्षमता ८२२ दशलक्ष घनफूट इतकी आहे. आज दुपारी तीन वाजता कुरनूर धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. 
Share This Article