ब्रेकिंग! तिसऱ्या महायुद्धाची नांदी? इस्रायल-इराणमधील संघर्ष वाढला

Admin
1 Min Read
  • इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष वाढतच चालला आहे.
  • शुक्रवारी इस्त्रायलने इराणवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात राजधानी तेहरान शहराला टार्गेट करण्यात आले. तुफान बॉम्बफेक करण्यात आली. या हल्ल्यांत संपूर्ण तेहरान हादरून गेले. या हल्ल्याला इराणने देखील उत्तर दिले. त्यामुळे जगामध्ये तिसरे महायुद्ध होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या दरम्यान आता इराणने थेट इस्त्रायलची मदत करणाऱ्या अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या राष्ट्रांना धमकी दिली आहे.
  • या इशाऱ्यामध्ये इराणने थेट म्हटले आहे की, जर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या राष्ट्रांनी जर इराणकडून केले जाणारे इस्त्रायलवरील हल्ले रोखल्यास त्यांचे या प्रदेशातील एअरबेस आणि जहाज नष्ट केली जातील. त्यानंतर ब्रिटनने यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही इस्त्रायली हल्ल्यामध्ये देखील कोणतीही सैन्य मदत दिलेली नाही. तसेच आम्ही इराणचे इस्त्रायलवरील हल्ले रोखलेले नाहीत. दरम्यान इराण आणि इस्त्रायलमधील या युद्धाचा परिणाम कच्च्या तेलावर होणार आहे. कच्च्या तेलाचे भाव वाढू शकतात. यामुळे भारतात पेट्रोलच्या किंमती वाढू शकतात. 
Share This Article