देश - विदेश
ब्रेकिंग! अहमदाबादमधील विमान क्रॅशनंतर केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात

- अहमदाबादमधील विमान दुर्घटनेच्या जखमा ताज्या असतानाच पुन्हा एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तराखंडच्या केदारनाथ धाममध्ये पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. आज केदारनाथ मार्गावर एक हेलिकॉप्टर कोसळले. याध्ये पायलटसह सात जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
- माहितीनुसार, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. ही दुर्घटना गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण नारायण दरम्यान घडली.
- हेलिकॉप्टर कोसळण्याचे कारण खराब हवामान असल्याचे सांगितले जात आहे. या अपघाताची माहिती देताना उत्तराखंडचे एडीजी कायदा आणि सुव्यवस्था डॉ. व्ही मुरुगेशन म्हणाले की, देहरादूनहून केदारनाथला जाणारे हेलिकॉप्टर गौरीकुंडमध्ये बेपत्ता झाले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबाबत निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले की, रुद्रप्रयागमध्ये हेलिकॉप्टर अपघात झाल्याची बातमी मिळाली आहे. एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि इतर बचाव पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. सर्व भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मी प्रार्थना करतो.



