ब्रेकिंग! सोलापुरात मध्यरात्री थरार

Admin
1 Min Read

सोलापुरात पोलिसांनी मध्यरात्री एकाचा एन्काऊंटर केला. पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे घरात लपून बसलेल्या आरोपीला पोलिसांनी ठार केले. शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख असे २३ वर्षीय पुण्यातील सराईत गुंडाचे नाव आहे. आज लांबोटी जवळ पुणे गुन्हे शाखेने त्याचा एन्काऊंटर केला. शाहरुखवर पुण्यात अनेक गुन्ह्याची नोंद होती.

शाहरुखवर पुणे शहर आणि जिल्ह्यातील हडपसर, वानवडी, कोंढवा, काळेपडळ या पोलीस ठाण्यांमधून सुमारे 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मकोकाच्या गुन्ह्यात शाहरुख फरार होता. शाहरूखला अटक करण्यासाठी पुणे पोलिस सोलापूरमध्ये दाखल झाले होते, पण शाहरूखने पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी प्रतिहल्ला करत शाहरूखचा एन्काऊंटर केला.

पुणे शहर पोलीस लांबोटी येथे एका गुन्ह्यासंदर्भात शाहरूखला अटक करण्यासाठी आले होते. पण, शाहरूखने फायरिंग केल्यामुळे पुणे शहर पोलिसांनी लांबोटीतील एका घरात फायरिंग केली आहे. दरम्यान शाहरुख हा पोलिसांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी सोलापूरमधील सरकारी रूग्णालयात दाखल केले होते. पण उपचारादरम्यान शाहरूखचा मृत्यू झाला.

Share This Article