राज्यात राजकीय ट्विस्ट!

Admin
1 Min Read
  • डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सोमवारी सायंकाळी ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ठाण्यातील नेहरू नगर भागात संध्याकाळी पाच वाजता पक्षप्रवेश सोहळा होणार असून यावेळी चंद्रहार पाटील शक्तिप्रदर्शन करणार आहेत. 
  • या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, धैर्यशील माने, मंत्री उदय सामंत, संजय शिरसाट, शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर, प्रताप सरनाईक व आमदार सुहास बाबर उपस्थित राहणार आहेत. पक्षात प्रवेश केल्यानंतर चंद्रहार पाटलांना महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याचेही समजते.
  • दरम्यान 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय संदेश जात आहे. कारण, चंद्रहार पाटलांना सांगली मतदारसंघातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी दिली होती. मात्र, तेथे त्यांना फक्त ५५ हजार मते मिळाली होती, तर अपक्ष म्हणून उभे असलेल्या काँग्रेसचे विशाल पाटील यांनी तब्बल ५.६९ लाख मते मिळवत मोठा विजय मिळवला होता.
  • दरम्यान, चंद्रहार पाटलांनी सोशल मीडियावरून आपल्या निर्णयाची माहिती दिली. क्रीडा क्षेत्रातील अडचणी सोडवण्यासाठी थेट प्रशासनाशी जोडणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला नवा सूर मिळाला आहे.
Share This Article