क्राईम
ब्रेकिंग! बेपत्ता हनिमून जोडपे केसमध्ये कल्पनेपलिकडचा ट्विस्ट

- मेघालयच्या शिलाँग शहरात हनिमूनसाठी गेलेले इंदूरचे एक नवविवाहित जोडपं अचानक बेपत्ता झाले होते. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला, जेव्हा राजा रघुवंशीचा मृतदेह डोंगरावर आढळून आला आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी गायब झाली. अखेर आता सोनमही सापडली असून तिला उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथून अटक करण्यात आली आहे.
- मेघालयचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि गाझीपूरचे अॅडिशनल एसपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम हिने स्वतः आत्मसमर्पण केले असून तिच्या अटकेने संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून सोनमने पती राजाची हत्या करण्यासाठी गुन्हेगारांची मदत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
- राजा आणि सोनमने अलीकडे लग्न केले होते. लग्नानंतर हे जोडपं मेघालयच्या शिलाँगला हनिमूनसाठी गेले होते. दरम्यान, त्यांनी गुवाहाटीतील कामाख्या देवीच्या दर्शनाला भेट दिली होती. मात्र त्यानंतर ते बेपत्ता झाले आणि काही दिवसांनी राजाचा मृतदेह टेकडीवर आढळला.
- तपासाअंती समोर आले की, सोनमनेच राजाला संपवण्यासाठी मध्यप्रदेशातील तीन गुन्हेगारांना कामावर ठेवले होते. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे. तर सोनमने गाझीपूर येथे आत्मसमर्पण करत गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिला वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून तिची पुढील चौकशी सुरू आहे. तिने हे कृत्य का केले, याचा तपास पोलीस करत आहेत.



