क्राईम
जंगलात हनिमूनसाठी गेले, पण नवविवाहित जोडप्यासोबत घडले सर्वात भयंकर!

- देशात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एक नवविवाहित कपल हनिमूनला सिक्किम येथे गेले होते. पण त्यांच्या या जीवन प्रवासाला दु:खद घटनेचे वळण लागले. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ जिल्ह्यातील रहाटीकर गावातील रहिवासी कौशलेंद्र सिंह आणि त्याची पत्नी अंकिता सिंह 24 मे रोजी सिक्किमला रवाना झाली होती. 29 मे रोजी संध्याकाळी त्यांची टॅव्हलर व्हॅन मगन जिल्ह्यात एक हजार फूट खोल दरीत कोसळली.
- वाहनासोबतच ते नदीत वाहून गेले, पण अजूनही त्यांचा पत्ता लागला नाही. दरम्यान, या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी आहेत. तसेच कौशलेंद्र आणि अंकितासह 8 प्रवासी अजूनही बेपत्ता आहेत. या घटनेनंतर एनडीआरफच्या टीमकडून सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. परंतु, खराब हवामानामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचणी येत असल्याचे समजते.



