ट्विस्ट! भारताने मारलं जास्त, सांगितलं कमी

Admin
1 Min Read
  • ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल जगभरातून भारतीय सैनिकांचे कौतुक केले जात आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने प्रथम फक्त दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, परंतु जेव्हा पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. मात्र आडमुठा पाकिस्तान भारतीय लष्कराच्या हल्ल्यात कोणतेही नुकसान झाला नसल्याचा दावा करत होता. मात्र, आता पाकिस्तानच्या अधिकृत कागदपत्रामधून महत्त्वाचा खुलासा झाला आहे.
  • समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या अधिकृत कागदपत्रातून असे उघड झाले आहे की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने त्या पाकिस्तानी तळांवरही हल्ला केला, ज्याची माहिती लष्कराने दिली नव्हती. पाकिस्तानच्या ऑपरेशन बन्यान अन मार्कोसवरील कागदपत्रात असे म्हटले आहे की, भारताने नमूद केलेल्या तळांपेक्षा कमीत कमी 8 जास्त तळांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी कागदपत्रात दिलेल्या नकाशात पेशावर, झांग, सिंधमधील हैदराबाद, पंजाबमधील गुजरात, गुजरांवाला, भावलनगर, अट्टोक आणि छोरवरील हल्ले दाखवले आहेत.
  • गेल्या महिन्यात झालेल्या हवाई हल्ल्यानंतर पत्रकार परिषदेत भारतीय हवाई दलाने या ठिकाणांची नावे घेतली नाहीत. म्हणजेच भारताने 20 नव्हे तर 28 ठिकाणी हल्ले केले होते. यावरून भारताने पाकिस्तानला कसा धडा शिकवला, हे स्पष्ट होते.
Share This Article