महाराष्ट्र

तुम्ही काय अभिनेत्री रश्मिका मंदाना आहात का?

  • राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर बोलून आम्हाला प्रसिद्धी मिळायला, त्या काय रश्मिका मंदाना आहेत का? असा टोला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी लगावला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज मुंबईत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.
  • यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अंधारे बोलत होत्या. मागच्या राज्यपाल महोदयांच्या तुलनेत या राज्यपालांचा नि:पक्षपाती दृष्टीकोन जास्त भावणारा आहे, असेही अंधारे म्हणाल्या. विरोधक प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्यावर आणि महिला आयोगावर टीका करतात, असा वार चाकणकर यांनी केला होता. त्यावर चाकणकर कोण आहेत? चाकणकर रश्मिका मंदाना आहेत की स्मृती इराणी आहेत? त्या कोणत्या क्षेत्रातील सुप्रीमो आहेत. राजकारण, बॉलीवूड की प्रशासन कशातील सुप्रीम आहेत, की त्यांच्यावर बोलल्याने प्रसिद्धी वगैरे मिळते, असा पलटवार अंधारे यांनी केला आहे.
  • काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात. त्यांनी या अंधश्रद्धेतून जितक्या लवकर शक्य तितक्या लवकर बाहेर यावे, अशी कोपरखळीही त्यांनी यावेळी मारली.
  • चाकणकर यांचे तत्परतेने पुढे येणारे लाडके बंधू सुनील तटकरेंनी चाकणकरांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करावा. चाकणकरांवर बोलण्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही. चाकणकर हा अत्यंत छोटा विषय आहे, असेही अंधारे यांनी म्हटले. 

Related Articles

Back to top button