महाराष्ट्र

वेटोळे घेऊन दंश करतो… अत्यंत लाजाळू आणि मांजरासारखे डोळे

  • पुण्यातील भोर येथील बनेश्वर परिसरात ‘बेडडोम मांजऱ्या साप’ नावाचा एक दुर्मिळ प्रजातीचा साप आढळून आला आहे. स्थानिक शेतकऱ्याच्या बाईकच्या पुढच्या कॅपमध्ये हा साप आढळून आला.
  • शेतकरी करण जाधव यांना हा साप दिसला, त्यांनी तात्काळ पुणे जिल्हा वन्यजीव आणि सर्परक्षक असोसिएशनचे कार्याध्यक्ष सदस्य विशाल शिंदे यांना कळवले. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्प बचाव पथक सापाला पकडण्यासाठी साप आढळला त्या ठिकाणी पाठवण्यात आली. सापाला सुरक्षितपणे पकडून वनक्षेत्रातील त्याच्या अधिवासात परत सोडण्यात आले. 
  • बोईगा बेडडोमी, ज्याला बेडडोमचा मांजर साप म्हणूनही ओळखले जाते, झाडांवर राहणारा हा साप सौम्य विषारी असतो. तसेच रात्री सक्रिय असतो. या प्रजातीच्या सापाचे डोळे मांजरासारखे मोठे असतात म्हणून त्याला ‘Cat Snake’ असेही म्हंटले जाते. हा साप अत्यंत लाजाळू आणि मानवापासून दूर राहणारा असतो. तसेच सुमारे एक मीटर लांबीचा असतो आणि त्याच्या अंगावर फिकट पट्टे असतात.

Related Articles

Back to top button