क्राईम

कॉलेजचे प्रेम पुन्हा फुलले!

  • दोघांचे लग्न झाले. मुले मोठी झाली. दोन कुटुंबाचा सुखी संसार सुरु होता. मात्र कॉलेजमधले जुने प्रेम पुन्हा फुलायला सुरुवात झाली अन् त्यातून लष्करात नोकरीला असलेला पती हा पत्नीला विषारी औषधाचे इंजेक्शन देऊन मारण्याचा प्लॅन करतो. हा प्लॅन यशस्वी होतो. मात्र पुढं अत्यंविधीच्या वेळी हा सगळा प्लॅन उघडकीस येतो.
  • धुळ्यातील रहिवासी अन् भारतीय सैन्यात क्लर्क असलेल्या कपिल बागुलाचा 2010 मध्ये शारदा उर्फ पूजा हिच्याशी विवाह झाला. तीही बीएसस्सी बीएड झालेली. त्याची सासरवाडी जळगावमधील धडगावची. दोघांचा सुखी संसार सुरू होता. नऊ वर्षांची मुलगी आणि सात वर्षांचा मुलगाही आहे. कपिल धुळ्यातील जयहिंद महाविद्यालयातून बीए झालेले. त्याचे प्रज्ञा या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र 2007 मध्ये तिचा विवाह झाला. ती त्याच शहरात राहत होती. तिला 17 आणि 13 वर्षांच्या मुली आहेत. अनेक वर्षे ते एकमेंकाना भेटले नव्हते. दोघांचा संसार सुरुळीत सुरू होता. मात्र, कौटुंबिक वादातून प्रज्ञा हिचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर होता. तीही बीएस्सी, एमबीए झालेली. तिच्या घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती. त्याचवेळी कपिल आणि प्रज्ञा हे दोघंही भेटले आणि त्यांचे जुने प्रेमसंबंध पुन्हा सुरू झाले. पण हे प्रेमप्रकरण नाहीतर अनैतिक संबंध होते. कपिल हा आपल्या जुन्या प्रेमप्रकरणात पुन्हा गुरफटला.
  • आपल्याला पत्नी, दोन मुले आहेत हे तो विसरून गेला. दोघंही लॉजवर भेटत होते. पूजाला हे समजल्यावर कपिलला ती विरोध करत असे.
  • पण कपिल हा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो तिला विरोध करत. पूजाने हे माहेरी सांगितले. पूजाच्या भावाने महिला आयोगाकडे तक्रार केली. पण काही दिवसाने ही तक्रार मागे घेण्यात आली. पूजाचा अनैतिक संबंधाला विरोध होत असल्याने कपिल अन् त्याच्या प्रेयसीने मिळून तिचा काटा काढण्याचा प्लॅन आखला. कपिलने पूजाला पेस्टिसाइडचे तीन ते चार इंजेक्शन दिले. तिच्या तोंडातून फेस येऊपर्यंत तो तिच्यासमोर बसलेला होता. तेही तब्बल दीड तास. म्हणजे पत्नीचा तो दीड तास आपल्या डोळ्याने मृत्यू पाहत होता. पूजाचा मृत्यू झाल्यानंतर तिला त्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये नेले. त्यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगितले. पण आपले भिंग फुटेल म्हणून कपिलने इतरांच्या मदतीने अंत्यविधीची तयारी सुरु केली.
  • पूजाचा भाऊ भूषण महाजनला फोन करून पूजाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पूजाचा भाऊ आणि इतर नातेवाइक धुळ्यात आले. तोपर्यंत देवपूर पश्चिमच्या पोलिस ठाण्याला मृत्यू प्रकरणाची माहिती मिळाली होती. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी नेले. त्यावेळी तिचे शरीर काळं-निळं पडले होते. तिचा मृत्यू विषारी औषधाने झाल्याचे समोर आले. 
  • पोलिसांनी चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. केवळ पतीच नाही तर सासू विजया बागूल, नणंद हिचाही यात हात असल्याचे चौकशीत उघडकीस आले. या तिघांनी तिला पकडून तिच्या हातावर पाय ठेवून तिला इंजेक्शन दिल्याचे उघडकीस आले. या तिघांना अटक केल्यानंतर प्रेयसीला जेरबंद करण्यात आले. जुन्या प्रेमामुळे दोन कुटुंबातील मुले आता उघड्यावर पडली आहेत, एवढं मात्र नक्की.

Related Articles

Back to top button