प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी हिने संन्यास घेतला आहे. सध्या ती तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच तिने पाकिस्तान आणि मुस्लिमांबाबत एक मोठे वक्तव्य केले. पाकिस्तानमधून तिच्यासाठी दररोज 50 पत्रं यायची, असे ती म्हणाली.
मुस्लिमांसाठी माझ्या मनात खूप प्रेम आहे. त्यांनी मला खूप प्रेम दिलं आहे. विशेषतः दुबईमध्ये, जिथे माझी आध्यात्मिक साधना 25 वर्षे चालली होती. या काळात मला तिथे खूप शांती आणि प्रेम मिळाले, असे ममता म्हणाली.
त्याचबरोबर जेव्हा मी बॉलिवूडची सुपरस्टार होते, तेव्हा मला पाकिस्तानमधून एका दिवसात पन्नास पत्रं मिळायची. त्यामुळे होय, माझ्या मनात मुस्लिमांसाठी खूप प्रेम आहे. पण माझ्या मनात दहशतवाद्यांसाठी कोणतेही प्रेम नाही. भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर ममताचे हे वक्तव्य आता खूप चर्चेत आहे.