बाईकवरुन दोघे क्लासला निघाले, वाटेत घात झाला

Admin
1 Min Read
  • पुण्यातील चाकण येथील वासुलीफाटा रोडवर बिरदवडी येथे भरधाव वेगात आलेल्या ट्रकने ओव्हरटेक करताना बाईकला जोरदार धडक देत दोन तरुणांना चिरडल्याची घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, त्या तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
  • याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुजय कडूसकर आणि सोहम कडूसकर असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. सोहम आणि सुजय हे दोघे कोरेगाव खुर्द या त्यांच्या गावातून चाकण येथे एमएससीआयटीच्या क्लासला चालले होते. दरम्यान
  • या अपघातात ट्रकच्या चाकाखाली आलेले दोघे तरुण जवळपास १५ ते २० फूट फरफटत नेल्याचा थरार स्थानिक नागरिकांनी सांगितला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी अपघाताची दखल घेऊन घटनास्थळी पंचनामा केला.
Share This Article