- पाकिस्तान सध्या तीन आघाड्यांवर संघर्ष करत आहे. एकीकडे भारत आणि अफगाणिस्तान पाकिस्तानला मार देत आहेत. तर दुसरीकडे बलुचिस्तान आर्मीच्या कारवायांनी पाकिस्तानी राज्यकर्त्यांना हैराण केले आहे. अशातच पाकला धक्का देणारी घडामोड घडली आहे. पाकने एक शहर गमावले आहे. बलुच आर्मीने सुराब शहरावर कब्जा केला आहे.
- बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते जयंद बलुचने काल एक अधिकृत निवेदन जारी करत या घटनेची पुष्टी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, सुराब शहरावर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तसेच येथील पोलिस स्टेशनसहित अनेक सरकारी संस्थांनाना आग लावण्यात आली.
- बलुच यांनी सांगितले की शहरातील बँक, लेवी स्टेशन, पोलिस स्टेशनसह अन्य सरकारी संस्थावर नियंत्रण मिळवले आहे. क्वेटा-कराची राजमार्ग आणि सुराब गदर रोडवर तपासणी आणि गस्त घालण्यात येत आहे. स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संध्याकाळी अनेक हत्यारबंद लोकांनी सरकारी इमारतींवर हल्ला केला.
- बलुच आर्मीने शहरावर कब्जा केल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही सरकारी वाहनांना आग लावण्यात आली आहे. बलुच कमांडर्सचा दावा आहे की, शहरातील सर्व सरकारी संस्था ताब्यात घेतल्या आहेत. अनेक ठिकाणी पाकिस्तानी सैन्याला हुसकावून लावले आहे. दरम्यान देशात इतकी मोठी घटना घडली तरी काल रात्रीपर्यंत पाकिस्तान सरकार किंवा अन्य यंत्रणांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती.
पाकिस्तानला जबर दणका
