- बलुचिस्तानचे मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार मीर यार बलोच यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला. या पत्रात त्यांनी 1998 मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये केलेल्या अणुचाचण्यांना नरसंहाराची सुरुवात म्हटले.
- एवढेच नाहीतर त्यांनी जागतिक समुदयाला पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त करण्याचे आवाहन देखील केले. त्यांनी मोदींना असे आवाहन केले की, भारताने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यलढ्यात उघडपणे पाठिंबा द्यावा.
- मीर यार बलोच यांनी पत्राची सुरुवात 28 मे 1998 रोजी बलुचिस्तानमधील चगाई येथे पाकिस्तानने केलेल्या अणुचाचण्यांपासून केली. त्यांनी लिहिले की, पाकिस्तानी सैन्याने नवाज शरीफ सरकारच्या संगनमताने बलोच भूमी उद्ध्वस्त केली. या स्फोटांमुळे चगाई आणि रास कोहच्या टेकड्यांवर अजूनही स्फोटकांचा घाण वास येतो. त्यांनी नमूद केले आहे की, या चाचण्यांमुळे मोठ्या प्रमाणावर शेतजमीन उद्ध्वस्त झाली, गुरेढोरे मृत्युमुखी पडली. एवढचं नाहीतर अंपग मुले जन्माला येत आहेत.
- बलुच नेत्याने पुढे दावा केला की, जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले तेव्हा बलुच लोकांनी उघडपणे भारताला पाठिंबा दिला. जर ऑपरेशन सिंदूर आणखी एक आठवडा चालू राहिले असते तर आज आपण स्वतंत्र राष्ट्र म्हणून भारत आणि जगाशी बोलत असतो. पत्राच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान मोदींना आवाहन केले की, भारताने बलुचिस्तानशी अधिकृत संबंध प्रस्थापित करावेत आणि दिल्लीत बलुचिस्तानचा दूतावास उघडावा.
बलुच नेत्याचा नवा धमाका, थेट मोदींना पत्र, म्हणाले…
