क्राईम
ट्विस्ट! वैष्णवीचे नको ते चॅट आम्ही पकडले, चार कानाखाली म्हणजे छळ नाही

- वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असून आतापर्यंत या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर आता आज पुणे न्यायालयात या प्रकरणात सुनावणी पार पडली.
- या सुनावणी दरम्यान एकाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे तो छळ होत नाही असा युक्तीवाद राजेंद्र हगवणेंच्या वकिलाने केला आहे. तसेच वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत चॅट सुरु होते आम्ही ते पकडले होते. असा युक्तीवाद देखील राजेंद्र हगवणेंच्या वकिलाकडून करण्यात आला आहे. तर आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत, 40 लाखांच्या फॉर्च्युनरसाठी वैष्णवीचा कशाला छळ करु? असं देखील आज पुणे न्यायालयात राजेंद्र हगवणेंच्या वकिलांनी म्हटले आहे.
- तर या प्रकरणातील आरोपींचे अद्याप मोबाईल सापडले नाही. तसेच वैष्णवीला मारहाण करण्यात आलेली हत्यारे, रॉड हस्तगत करायचे आहेत. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. या युक्तीवादानंतर या प्रकरणात पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माला एका दिवसाची पोलिस कठोडी सुनावण्यात आली आहे. तर सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे याला 31 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.



