शेपूट वाकडेच, ‘पीओके’मध्ये पुन्हा दहशतवादी तळ सक्रिय

Admin
1 Min Read
  • नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सक्रिय झाले असून प्रशिक्षण केंद्रांवर आणि लाँचपॅडवर हे दहशतवादी, कट्टरतावादी परतण्यास सुरुवात झाली आहे. भारतातील सीमा सुरक्षा दल अर्थात बीएसएफचे इंस्पेक्टर जनरल शशांक आनंद यांनी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती जारी केली.
  • ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू असून पाकिस्तानवर कुठलाच भरवसा ठेवता येणार नाही. बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेचे संरक्षण करताना कुठलीच कसर सोडलेली नाही, असेही पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले.
  • भारतीय सैन्य दलांनी या ऑपरेशनच्या माध्यमातून शत्रूचे मनसुबे हाणून पाडले आहेत. सैन्याच्या कारवाईत पाकिस्तानच्या चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. सीमेपलीकडून संभाव्य दहशतवादी कारवायांच्या शक्यतेने भारतीय सीमेवर दक्षता वाढविण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
  • सीमेपलीकडून गोळीबार किंवा घुसखोरीची योजना आखली जाऊ शकते अशी माहिती मिळाली असून त्याच पार्श्वभूमीवर आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आणि सतर्क आहोत, असे पोलीस महानिरीक्षक शशांक आनंद म्हणाले.
Share This Article