काय सांगता! ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप जिंकणार नाही हे आधीच ठरलं होतं?
गजविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. वर्ल्डकपचे आयोजन करणारा संघ कधीच वर्ल्डकप जिंकत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मागील ७ वर्ल्डकपपासून असेच घडले आहे. गतविजेता ऑस्ट्रेलिया संघ टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. गट १ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे समान (प्रत्येकी ७) गुण आहेत.
पण नेट रनरेटच्या आधारे इंग्लंडने सेमी फायनलमध्ये एन्ट्री केली आहे. दरम्यान, हा T20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलिया आपले जेतेपद राखू शकणार नाही, हे निश्चित झाले होते. स्पर्धेच्या सुरुवातीलाच असे संकेत मिळाले होते. ज्यावरून कांगारू संघ वर्ल्डकप जिंकणार नाही, असे दिसत होते. पहिला T20 विश्वचषक २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळला गेला होता. या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. २००७ पासून ७ टी-20 विश्वचषक खेळले गेले आहेत. हा ८ वा वर्ल्डकप आहे. पण आतापर्यंत कोणत्याही यजमान देशाने एकदाही T20 विश्वचषक जिंकलेला नाही