- पाकिस्तानात लष्कराच्या ताफ्यावर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानातील कराची-क्वेटा महामार्गावर लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात ३२ सैनिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
- कराची-क्वेटा महामार्गावर एक विस्फोटकाने भरलेली गाडी उभी करण्यात आली होती. पाकिस्तानी लष्कराचा ताफा तिथून जाताचा गाडीचा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ताफ्यात एकूण आठ वाहनांचा समावेश होता. यातील तीन वाहने स्फोटात लक्ष्यित झाली. यात सैनिकांच्या कुटुंबियांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाचा समावेशदेखील होता.
- दरम्यान, पाकिस्तानात लष्कर आणि बलुच लिबरेशन आर्मी यांच्यातील संघर्ष अनेकदा समोर आलेला आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील अधिकारी अंतर्गत सुरक्षेतील अपयश लपविण्याचा प्रयत्न करत आहेत.
- तसेच संपूर्ण घटनेवर पांघरूण घालण्यासाठी अधिकाऱ्यांकडून यास स्कूल बसवरील हल्ल्यासारखे भासविले जात आहे. त्यामुळे आता अधिकारी त्यांच्या सुरक्षेतील त्रुटी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या हल्ल्याची जबाबदारी अद्यापही कुठल्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही.
ब्रेकिंग! एक-एक करत तीन गाड्या उडवल्या
