हवामान

खुशखबर! मान्सून महाराष्ट्रात दाखल

  • सध्या सोलापूरसह संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ऐन मे महिन्यात आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मान्सून आज महाराष्ट्रात दाखल झाला आहे. यंदा तब्बल 12 दिवस आधीच मान्सून राज्यात दाखल झाला आहे. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आनंदाचे वातावरण आहे.
  • हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. यंदा तब्बल 12 दिवस आधीच मान्सूनने राज्यात प्रवेश केला आहे. आज राज्याच्या काही भागांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. आठवडाभरापूर्वीच मान्सूनचे अंदमान, निकोबार बेटांवर आगमन झाले होते. त्यानंतर मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरणाची निर्मिती झाली होती. केरळमध्ये देखील मान्सून वेळेआधीच दाखल झाला होता. त्यानंतर आज मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

Related Articles

Back to top button