ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्र सरकारने जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडण्यासाठी शिष्टमंडळ तयार केले आहे. या शिष्टमंडळात वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) आपल्या खासदाराला पाठवण्यास नकार दिला आहे.
केंद्र सरकारने काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांच्या खासदारांना या मोहिमेत सहभागी केले आहे. तसेच, टीएमसी खासदार युसूफ पठाण यांचे नावही या यादीत होते. मात्र, टीएमसीने पठाण यांचे नाव मागे घेतले आहे.
टीएमसीचे राज्यसभा खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी यामागचे कारणही स्पष्ट केले आहे. डेरेक यांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर राजनैतिक व्यवहार करणे हे केंद्र सरकारचे काम आहे. तृणमूल काँग्रेस पूर्णपणे राष्ट्रहितासोबत आहे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर राजनैतिक व्यवहार करणे हे केंद्र सरकारचे काम आहे आणि हे काम केंद्रानेच केले पाहिजे.
दरम्यान शिष्टमंडळात समाविष्ट असणाऱ्या युसूफ पठाणने मोठा निर्णय घेत भारत सरकारला आपण या दौऱ्यासाठी उपलब्ध राहणार नाही, असे म्हटले आहे.