सोलापूर
सोलापूर! रविवार पेठ, जोशी गल्लीत रस्ता ओलांडताना अपघात

- सोलापूर (प्रतिनिधी) रस्ता ओलांडताना अपघात प्रकरणी अज्ञात रिक्षा चालकाविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना १७ मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जोशी गल्ली येथे घडली. याप्रकरणी विनय गंगाधर सामलेट्टी (वय-२६,रा.रविवार पेठ, जोशी गल्ली) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात रिक्षाचालका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
- याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी यांची आजी घरातून घरासमोर राहणारे आडम यांच्या घरी रस्ता ओलांडन जात असताना अज्ञात रिक्षाचालकाने त्याच्या ताब्यातील रिक्षा निष्काळजीपणाने चालवून फिर्यादी यांच्या आजीला धडक देऊन गंभीर जखमी करत औषध उपचारसाठी दाखविण्याकरता परस्पर निघून गेला आहे. असे फिर्यादीत नमूद आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार माने हे करीत आहेत.