- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात एक माणूस केक पोहोचवताना दिसला होता. धक्कादायक बाब म्हणजे ज्योती मल्होत्रा देखील याच व्यक्तीसोबत दिसली होती. ब्लॅकआउट दरम्यान देखील युट्यूबर ज्योती ही पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होती. पहलगाम हल्ल्यापूर्वी ज्योतीने पाकिस्तान आणि चीनलाही भेट दिली होती.
- हरियाणाची युट्यूबर ज्योती ही पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून चर्चेत आहे. याबाबत हरियाणाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने असा दावा केलाय की, पाकिस्तानी गुप्तचर संस्था ज्योतीला त्यांची प्रॉपर्टी म्हणून वापरत होती. ज्योतीला अटक करण्यात आली आहे.
- पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या लष्करी संघर्षादरम्यान ज्योती नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या एका पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या संपर्कात होती, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
- पाकिस्तानसोबत संपर्कात असणाऱ्या 33 वर्षीय ज्योतीला न्यू अग्रसेन एक्सटेंशन येथून अटक करण्यात आली. तिच्यावर अधिकृत गुपिते कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. न्यायालयात हजर केल्यानंतर तिला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
खळबळजनक! पहलगाम हल्ल्यानंतर दिल्लीत केक अन् सेलिब्रेशन
