कर्नल सोफिया कुरेशीबाबत नको नको ते बोलले

Admin
1 Min Read
  • कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेशचे मंत्री विजय शाह यांना फटकारत शाह यांच्याकडून दाखल करण्यात आलेला माफीनामादेखील फेटाळून लावला आहे. तसेच या प्रकणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत.
  • शाह यांच्या वकिलाने सांगितले की, कुरेशी यांच्यावर केलेल्या विधानाप्रकरणी मंत्री शाह यांनी माफी मागितली आहे. त्यावर प्रतिप्रश्न उपस्थित करत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी म्हटले की, ही कोणत्या प्रकारची माफी आहे. तुम्ही एक जबाबदार व्यक्ती आहात, त्यामुळे तुम्ही बोलताना तुमच्या शब्दांची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही चुका करता आणि न्यायालयात आल्यानंतर माफी मागता, असेही न्यायालायाने शाह यांना सुनावले.
  • तुम्ही एक जबाबदार आणि अनुभवी राजकारणी आहात, असे सांगत तुम्ही नेमकी कशासाठी माफी मागितली याचे व्हिडिओ दाखवा, असे न्यायालयाने सांगितले. तुम्ही माफी कशी मागितली हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. काही लोक हातवारे करून माफी मागतात. तर, काही फक्त मगरीचे अश्रू ढाळतात. त्यामुळे तुम्ही नेमकी कशी मागितली हे न्यायालयाला जाणून घ्यायचे आहे.
  • मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी सोफिया कुरेशी यांना ‘पाकिस्तानी आणि दहशतवाद्यांची बहीण’ म्हटले होते. ज्यांनी भारताच्या मुलींना विधवा केले. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याच बहि‍णीच्या मदतीने धडा शिकवला, असे शाह म्हणाले होते.
Share This Article