- पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उध्वस्त केले. त्यासोबत पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांवर ही हल्ले केले. पण भारताच्या या हल्ल्याने थयथयाट करणाऱ्या पाकिस्तानने तरीसुद्धा आपल्या कुरापती थांबवल्या नाही. पाकिस्तानने भारतातील सीमा भागांना लक्ष करत ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला.
- जम्मू-काश्मीर, गुजरात आणि पंजाबमधील शहरांना लक्ष्य करायचे होते. मात्र, त्यांची प्रत्येक योजना उधळून लावली गेली. आता भारतीय सैन्याने सुवर्ण मंदिर आणि अमृतसर शहराचे संरक्षण कसे केले, हे सगळ्यांना व्हिडीओमधून दाखवले आहे.
- भारतीय लष्कराच्या माहितीनुसार भारताने पाकिस्तानचा मोठा कट उधळला. पाकच्या निशाण्यावर अमृतसरचे सुवर्णमंदिर होते. ६ आणि ७ मे रोजी पाक सैन्याने सुवर्णमंदिराला लक्ष्य करीत तेथे हल्ला करण्याचा कट रचला. मात्र, भारतीय सैन्याने हा डाव उधळून लावला. भारतीय सैन्याने आकाश क्षेपणास्त्र प्रणालीद्वारे हा कट उधळला. तसेच यादरम्यान पाकिस्तानी क्षेपणास्त्रही पाडल्याची माहिती उघड करण्यात आली.
- अमृतसर येथे भारतीय सैन्याने आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, एल-७० हवाई संरक्षण तोफा यासह भारतीय हवाई संरक्षण प्रणालींनी अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आणि पंजाबमधील शहरांचे पाकिस्तानी क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षण कसे केले, याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी पाकिस्तानने डागलेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष देखील भारतीय लष्कराने दाखवले, जे भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने अडवले आणि पाडले.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकचा कुटील डाव उधळला
