हवामान

ब्रेकिंग! राज्यात जोरदार पावसाचा इशारा

  • गेल्या काही दिवसांपासून राज्याला अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले आहे. आता पुढील काही दिवसांचाही अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आहे. राज्यातील पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत ऑरेंज तर काही भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • राज्यात कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, बीड, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, लातूर, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
  • सोलापूर जिल्ह्यात आज अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. काही भागात विजेच्या कडकडांसह वादळी पाऊस झाला. 

Related Articles

Back to top button