आज सकाळी सहा वाजता आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून इस्त्रोने पीएसएलवी सी61 रॉकेट लाँच केले होते. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे इस्त्रोचे हे मिशन अपयशी ठरले. PSLV रॉकेट तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकले नाही, अशी माहिती इस्त्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी दिली. PSLV रॉकेट तिसरा टप्पा पार करू शकले नाही.
यातील सॅटेलाइट EOS-04 सारखेच होते. पृथ्वीची अधिक माहिती गोळा करणे तसेच फोटो पाठवण्याचे काम या सॅटेलाइटचे होते. महत्वाच्या कामांसाठी माहिती आवश्यक होती. ही माहिती या अभियानाच्या माध्यमातून गोळा करण्याचे इस्त्रोचे उद्दीष्ट होते. देशाच्या बॉर्डरवर होणाऱ्या हालचाली टिपण्याचेही काम या माध्यमातून होणार होते.
पीएसएलव्ही रॉकेट EOS-09 ला सूर्य समकालिक कक्षामध्ये घेऊन गेले. सी बँड सिंथेटिक अपर्चर रडार असलेले ईओएस 09 हवामानाच्या कोणत्याही परिस्थितीत पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उच्च गुणवत्तेचे फोटो घेण्यास सक्षम होते. EOS 09 सॅटेलाइट देशाच्या रिपोर्ट सेंसिंग क्षमतेला आणखी बळकटी मिळवून देण्याच्या उद्देशाने डिझाईन करण्यात आले होते. याला दहशतवाद विरोधी मोहीम, घुसखोरी किंवा अन्य संशयास्पद हालचालींचा शोध घेण्यासाठी तयार करण्यात आले होते. याचे वजन 1710 किलो इतके होते.