सोलापूर
ब्रेकिंग! सोलापुरात मध्यरात्री मोठी दुर्घटना

सोलापूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अक्कलकोट रोड एमआयडीसी भागातील एका कारखान्याला भीषण आग लागली आहे. मध्यरात्री साधारण तीनच्या सुमारास एमआयडीसीतील एका कंपनीला आग लागली. या आगीत तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री तीनच्या सुमारास भीषण आग लागली. सध्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही पाच ते सहा जण कारखान्यात अडकल्याची माहिती आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पोहोचली आहे. तर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.



