देश - विदेश
ब्रेकिंग! ओवेसींनी 140 कोटी भारतीयांची मने जिंकली

- भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि सीमापार दहशतवादाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळाची घोषणा करून जगभरात त्याची चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ जाणार आहेत.
- या भारतीय शिष्टमंडळाच्या टीममध्ये एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांचाही समावेश करण्यात आला आहे.
- या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये भाजपचे खासदार रविशंकर प्रसाद, बैजयंत पांडा, जेडीयूचे संजय कुमार झा, डीएमकेच्या कनिमोझी करुणानिधी, काँग्रेसचे शशी थरूर, राष्ट्रवादीच्या (शरद पवार) सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे (शिंदे गट) श्रीकांत शिंदे यांचा समावेश आहे. प्रत्येक टीममध्ये पाच खासदार असणार आहेत. ओवैसी हे बैजयंत पांडा यांच्या टीमचा भाग असतील. ओवैसी यांनी पाकिस्तानविरुद्धच्या ‘टीम इंडिया’ शिष्टमंडळात समावेश केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. असदुद्दीन ओवैसी म्हणाले, आम्ही भारत सरकार आणि आमच्या देशाचे प्रतिनिधित्व करत आहोत, आम्ही त्या देशांमध्ये जाऊन सांगू की आमच्या मुली कशा विधवा होत आहेत, आमची मुले अनाथ होत आहेत आणि पाकिस्तान आमच्या देशाला कसे अस्थिर करू पाहत आहे. ओवेसी म्हणाले, मी ज्या टीमचा भाग आहे, त्याचे नेतृत्व माझे चांगले मित्र बैजयंत जय पांडा करत आहेत.
- पाकिस्तान आपल्या देशात दहशतवादाला प्रोत्साहन देतो, हे आपल्याला संपूर्ण जगाला सांगावे लागेल. हा कोणत्याही पक्षाशी संबंधित विषय नाही. परदेशात जाण्यापूर्वी आपण एक बैठक देखील घेऊ. हे खूप मोठे काम आहे. ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहे, असेही ते म्हणाले.