देश - विदेश
ब्रेकिंग! पाकिस्तानात फिरायला गेली, हेर होऊन परतली

- पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली हरियाणा आणि पंजाबच्या वेगवेगळ्या भागातून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या लोकांमध्ये लोकप्रिय ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिचा देखील समावेश आहे.
- ज्योतीवर भारताशी विश्वासघात केल्याचा आणि पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- हरियाणातील युट्यूबर ज्योतीला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्योतीचे इंस्टाग्राम तसेच यूट्यूबवर @travelwithjo1 नावाने अकाउंट आहे. यामध्ये तिने पाकिस्तान प्रवासाचे अनेक व्हिडिओ आणि रील पोस्ट केली आहेत. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील एका पोस्टमध्ये इश्क लाहोर असे देखील लिहिलेले आहे.
- ज्योतीवर तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पाकिस्तानची चांगली प्रतिमा मांडण्याचे काम सोपविण्यात आल्याचा आरोप आहे. तिचे एका पीआयओशी जवळचे संबंध निर्माण झाले आणि अलीकडेच ती त्याच्यासोबत इंडोनेशियातील बाली येथे गेली.
- तिने भारतीय ठिकाणांशी संबंधित संवेदनशील माहिती शेअर केली आणि दिल्लीतील तिच्या वास्तव्यादरम्यान पीएचसी हँडलर दानिशच्या संपर्कात राहिली.
- ज्योतीने पाकिस्तानला जाऊन तिथल्या अनारकली मार्केटचा व्हिडिओ बनवला आणि तो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला. याशिवाय, तिने दोन्ही देशांची तुलना त्यांच्या खाद्यपदार्थ, संस्कृती आणि अशा अनेक उपक्रमांद्वारे करून संवेदनशील माहिती शेअर केली आहे.
- पाकिस्तानी उच्चायोगातील कर्मचारी एहसान-उर-रहीम उर्फ दानिश यांना 13 मे 2025 रोजी भारत सरकारने हेरगिरीत सहभागी असल्याबद्दल पर्सना नॉन ग्राटा घोषित केले आणि देश सोडण्याचे आदेश दिले. हरियाणाची रहिवासी ज्योती सतत त्याच दानिशच्या संपर्कात होती. ज्योतीवर भारतीय दंड संहिताच्या कलम अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत.