प्रार्थना करा, अल्लाहने त्यांची शेपटी सरळ करावी, नाहीतर…

Admin
1 Min Read
  • एआयएमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवत स्पष्ट इशारा दिला आहे. पहलगाम येथे 26 निष्पाप पर्यटकांच्या हत्या करणाऱ्या पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांविरोधात बोलताना त्यांनी म्हणाले की, प्रार्थना करा, अल्लाहने त्यांची शेपटी सरळ करावी, नाहीतर वेळ आली तर ती आपल्यालाच सरळ करावी लागेल.
  • हैदराबाद येथील हज हाऊसमध्ये आयोजित कार्यक्रमात हज यात्रेकरूंशी संवाद साधताना त्यांनी पाकिस्तानच्या कटकारस्थानावर भाष्य करत देशातील सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नसल्याचे ठामपणे सांगितले.
  • ओवेसी यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून त्यांना कलमा म्हणायला लावले. जे म्हणू शकले नाहीत, त्यांना लक्ष्य करण्यात आले. हे पाकिस्तानकडून हेतुपुरस्सर आखलेले षड्यंत्र होते, पण भारताने ते उधळून लावले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Share This Article