क्राईम

मोठी बातमी! मुंबई विमानतळावर आयसिसच्या दहशतवाद्यांना अटक

  • पुणे आयएसआयएस मॉड्यूल प्रकरणात मोठी कारवाई करत राष्ट्रीय तपास यंत्रणेने दोन फरार दहशतवाद्यांना अटक केली आहे. अब्दुल्ला फैयाज शेख आणि तल्लाह लियाकत खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 
  • हे दोघेही इंडोनेशियात लपून बसले होते. दरम्यान, लवकरच न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
  • आयईडी बनवण्याच्या आणि चाचणी करण्याच्या प्रकरणात बंदी घातलेल्या आयएसआयएस दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूलचे हे आरोपी सदस्य आहेत. ते गेल्या दोन वर्षांपासून फरार होते आणि एनआयएच्या विशेष न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट देखील जारी केले होते. एनआयएने दोन्ही आरोपींची माहिती देण्यासाठी प्रत्येकी तीन लाख रुपयांचे रोख बक्षीसही जाहीर केले होते.
  • दरम्यान, एनआयएने पुण्यातील कोंढवा भागात छापा टाकून आयसिस मॉड्यूल उद्ध्वस्त केले होतं. मात्र, ते दोघेही इंडोनेशियाला पळून गेले होते. ते जकार्तामध्ये अनेक महिन्यापासून लपून बसले होते, अशी एनआयएची माहिती आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती इंडोनेशियाला दिल्यानंतर दोघांना डीपोर्ट करण्याचा निर्णय इंडोनेशियाने घेतला. त्यानंतर भारतात परतण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन ब्युरोने रोखले. यानंतर एनआयएच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले आणि अटक केली. 
  • दरम्यान, अब्दुल्ला फैयाज शेख आणि तलहा खान यांच्या व्यतिरिक्त मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसिरुद्दीन काझी, झुल्फिकार अली बडोदावाला, शमिल नाचन, अकीफ नाचन आणि शाहनवाज आलम अशी अटक करण्यात आलेल्या इतरांची नावे आहेत.

Related Articles

Back to top button