देश - विदेश
ऑपरेशन सिंदूर! होय, भारताने घुसून मारले

- भारतीय सैन्याने पाकिस्तानात राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचं यश अखेर पाकिस्तानने मान्य केले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीच ही गोष्ट मान्य केली आहे. भारताने केलेल्या प्रत्युत्तराच्या कारवाईत देशातील एअरबेस उद्धवस्त झाल्याचे शरीफ म्हणाल. पाकिस्तानी पंतप्रधानांचा हा कबुलीनामा जगासमोर आला आहे.
- शरीफ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यात 9 आणि 10 तारखेच्या रात्री असीम मुनीर यांनी मला फोनवर सांगितले की, भारताने बॅलेस्टिक मिसाइल लाँच केले आहेत. यातील एक मिसाइल नूरखान एअरबेसवर पडली आहे. काही मिसाइल्स अन्य ठिकाणी पडल्या आहेत. आपल्या वायूसेनेने स्वदेशी टेक्निकचा वापर केला. तर त्यांनी चीनी विमानांवर आधुनिक गॅझेट आणि तंत्रज्ञानाचा वापर केला.
- पाकिस्तानच्या दृष्टीने नूरखान एअरबेस हा अतिशय महत्वाचा आहे. व्हीव्हीआयपी आणि हाय लेव्हल मिलिट्री एविएशन सेंटर म्हणजे हा एअरबेस आहे. हा एअरबेस राजधानी इस्लामाबादपासून जवळच आहे. आतापर्यंत सॅटेलाइटद्वारे मिळालेले फोटो आणि माहितीच्या आधारे भारतीय सैन्याने अगदी अचूकपणे निशाणा साधला होता. नूरखान एअरबेसच नाही तर अन्य ठिकाणचे टार्गेटही अचूक होते.
- इस्लामाबाद जवळील नूरखान एअरबेस पाकिस्तानी वायूसेनेला ऑपरेशन्समध्ये मदत करतो. देशातील टॉप व्हीव्हीआयपी एअर ट्रान्सपोर्टसाठी देखील या एअरबेसचा वापर केला जातो. स्पेस कंपनी सॅटलॉजिकच्या सॅटेलाइट फोटो जे अर्थ इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म SkyFi कडून इंडिया टुडेला देण्यात आले होते. यातून पाकिस्तानच्या सर्वात महत्वाच्या एअरबेसवर हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले आहे.