क्राईम
माणुसकी मेली! परळीत खुनी हल्ला, तो वेदनेने विव्हळत होता आणि….

- बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे संतोष देशमुख हत्याकांडाने सारा महाराष्ट्र संतप्त असतानाच आता बीड जिल्ह्यातीलच परळीत एक धक्कादायक घटना घडली आहे.
- माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असून दहा ते बारा जणांचे टोळके अपहरण करुन आणलेल्या एका तरुणाला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
- बीडच्या परळीत ही गंभीर घटना घडली असून संतोष देशमुख यांचे जसे अपहरण आणि त्यांना अमानुष मारहाण झाली होती, अगदी तशाच प्रवृत्तीची आठवण या घटनेने झाली आहे.
- परळीतील शिवराज हनुमान दिवटे या तरुणाचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर शिवराज यालाअमानुष मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यात एक म्होरक्या आणि त्याचे साथीदारांचा समावेश आहे. या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियांवर फिरत असून यासंबंधीचे वृत्तही विविध माध्यमांनी दिले आहे.
- शिवराज हा शुक्रवारी जलालपूर येथील अखंड हरिनाम सप्ताहातून घरी परतत होता. त्यावेळी परळीतील रिलायन्स पेट्रोल पंपावरुन शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास शिवराज याचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याला टोकवाडी गावातील रत्नेश्वर मंदिराच्या परिसरात नेण्यात आले. तेथे टोळक्यांनी शिवराज याला बेदम मारहाण केली. दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करुन पोलिस कायदेशीर कारवाई करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेत आहेत.