पाकिस्तानला घडवली अद्दल, आता बांगलादेशाचा वाजेल बँड

Admin
1 Min Read
  • ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केल्यानंतर आता भारताने आपला मोर्चा बांगलादेशकडे वळवला आहे. बांगलादेशात सत्तापालट झाल्यापासून भारताची डोकेदुखी वाढली आहे. येथील अंतरिम सरकारचा प्रमुख युनूस सातत्याने भारतविरोधी कारवाया करत आहे. त्यामुळे आता बांगलादेशला धडा शिकवण्याचा प्लॅन केंद्र सरकारने तयार केला आहे. सरकारच्या विदेश व्यापार महानिदेशालयाने बांगलादेशातून येणाऱ्या काही वस्तूंच्या आयातीवर बंदी घातली आहे.
  • केंद्र सरकारचा हा निर्णय तत्काळ प्रभावाने लागू झाला आहे. अधिसूचनेनुसार बांगलादेशातील तयार कपड्यांची आयात आता फक्त न्हावाशेवा आणि कोलकाता येथील बंदरांच्या माध्यमातून होईल. याव्यतिरिक्त प्रोसेस्ड फूड, फळे, फळांचे स्वाद असणारे कार्बोनेटेड पेय, कापूस आणि सुती दोऱ्यांचे वेस्ट, प्लास्टिक, पीव्हीसी तयार माल, लाकडाचे फर्निचरसहीत अन्य वस्तूंना विशिष्ट बंदर प्रतिबंधांच्या अंतर्गत आणण्यात आले आहे.
  • भारताने आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरममध्ये सर्व भूमी सीमा शुल्क स्टेशन्स (एलसीएस) किंवा एकीकृत स्टेशन्स (आयसीपी) आणि उत्तर बंगालमधील चंगराबांधा, फुलबारीच्या माध्यमातून बांगलादेशी निर्यातीवर बंदर प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रोसेस्ड फूड, फळे, फळांचे स्वाद असणारे कार्बोनेटेड पेय, कापूस आणि सुती दोऱ्यांचे वेस्ट, प्लास्टिक, पीव्हीसी तयार माल, लाकडाचे फर्निचरसहीत अन्य वस्तूंचा यामध्ये समावेश आहे.
Share This Article