ट्रम्प तात्याच्या स्वागतासाठी सौदी अरेबियात ‘भुतनी’ डान्स

Admin
1 Min Read
  • अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कुठे गेल्यास काही हटके बातमी येणारच. सध्या ट्रम्प हे सौदी अरेबियाच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. ट्रम्प हे सौदी आणि कतारनंतर संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे पोहोचले. तिथे त्यांचे अत्यंत वेगळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आले.
  • अल-अयाला हे नृत्य प्रामुख्याने लग्न समारंभात सादर केले जाते. ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सल्तनतमधील लोक उत्सवाच्या प्रसंगी हे नृत्य सादर करतात. अल-अयालामध्ये सर्व वयोगटातील पुरुष आणि महिला सहभागी असतात.
  • ट्रम्प हे अबू धाबीमधील युएईच्या राष्ट्रपती राजभवनातील कसर अल वतन येथे पोहोचले. ट्रम्प हे राजभवनात पोहोचताच पांढऱ्या कपड्यात असलेल्या तरूणींनी केस मोकळे सोडून नृत्य सुरू केले. याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. खरं तर, या तरूणी ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीच्या सल्तनतची पारंपारिक कला ‘अल-अयाला’ सादर करत होत्या.
  • एका व्हिडिओमध्ये ट्रम्प हे युएईच्या राष्ट्रपती भवनातील कसर अल वतन येथे महिलांच्या दोन रांगांमधून चालत आहेत. महिलांनी पांढरे रंगाचे कपडे घातले आहेत. त्यांचे केस लांब आणि काळे आहेत. ट्रम्प हे तेथून जात असताना महिला त्यांच्या मागे उभ्या असलेल्या पुरुषांनी वाजवलेल्या ढोलांच्या तालावर त्यांचे मोकळे सोडलेले केस फिरवत नृत्य करत आहेत.
Share This Article