देश - विदेश
ब्रेकिंग! डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम

- सीमेवर तणाव कमी करण्यासाठी काम करत राहण्यावर भारत-पाकिस्तान डीजीएमओ यांच्यात झालेल्या चर्चेत दोन्ही देशांकडून सहमती दर्शवण्यात आली आहे. याबाबात भारतीय लष्कराकडून माहिती देण्यात आली आहे. भारत आणि पाकमधील सुरू असलेल्या तणावा दरम्यान तुर्कीने अगदी उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. तुर्कीने शेकडो ड्रोन आणि लष्करी कर्मचारी पाठवून पाकिस्तानला तांत्रिक आणि धोरणात्मक मदत केली, ज्यामुळे भारतात तुर्कीविरुद्ध संताप निर्माण झाला आहे. या रागाचा परिणाम सोशल मीडियावर दिसून आला जिथे #BoycottTurkey ट्रेंड होऊ लागला आणि अनेक भारतीयांना तु्र्कीला पर्यटनासाठी जाणार नसल्याचे सांगितले. याच दरम्यान आता अमेरिका आणि तुर्कीच्या कराराची चर्चा रंगली आहे.
- अमेरिकेने तुर्कीला सुमारे 304 दशलक्ष डॉलर्स किमतीची क्षेपणास्त्रे विकण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. भारत आणि पाकमधील तणाव शिगेला पोहोचला असताना आणि तुर्की उघडपणे पाकला मदत करत असताना ही मंजुरी देण्यात आली. या क्षेपणास्त्र करारात तुर्कीसाठी हवेतून हवेत मारा करणारी AIM-120 AMRAAM क्षेपणास्त्रे समाविष्ट आहेत. यासोबतच तुर्कीने 225 दशलक्ष डॉलर्स किमतीची 53 प्रगत मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची आणि 79.1 दशलक्ष डॉलर्स किमतीची 60 ब्लॉक सेकंड क्षेपणास्त्रांची मागणी केली आहे.
- हा करार यूएस डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सीने प्रस्तावित केला आहे. परंतु त्याला अद्याप अमेरिकन काँग्रेसची मान्यता मिळालेली नाही. जर हा करार मंजूर झाला तर दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध आणखी मजबूत होतील. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प भारतासोबत डबल गेम खेळत असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान जेव्हा तुर्कीने रशियाकडून एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी केली होती. त्यावेळी अमेरिका आणि तुर्कीमध्ये तणाव निर्माण झाला होता. परंतु आता नवीन करारावरुन अमेरिका तुर्कीसोबत संबंध सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.



