देश - विदेश

ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर होता, योग्य वेळ आल्यावर संपूर्ण पिक्चर दाखवू

  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज गुजरातच्या भूज एअरबेसवर पोहोचले. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतरचा हा त्यांचा भूजमधील पहिलाच दौरा होता. भूज एअरबेसवर संरक्षणमंत्र्यांनी सैनिकांचे मनोधैर्य वाढवले. भूज एअरबेससाठी उड्डाण करण्यापूर्वी संरक्षणमंत्र्यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या दौऱ्याची माहिती दिली होती. भूजला पोहोचल्यानंतर संरक्षणमंत्र्यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला.
  • राजनाथ सिंह यांनी भूजमध्ये जवानांना संबोधित केले. ते म्हणाले, तुम्हा सर्वांमध्ये येऊन मला अभिमान वाटत आहे. हे भूज 1965 आणि 1971 मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाचे साक्षीदार राहिले आहे. आज पुन्हा एकदा हे भूज पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाचे साक्षीदार ठरले आहे.
  • ब्रह्मोस क्षेपणास्त्रावर बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, आता भारतात बनलेली अस्त्रे आणि शस्त्रेही आपल्या सैन्य शक्तीचा भाग बनली आहेत. ब्रह्मोसची ताकद पाकिस्तानने स्वतः स्वीकारली आहे. ब्रह्मोसने पाकिस्तानला रात्रीच्या अंधारात दिवसाचा प्रकाश दाखवला. संरक्षणमंत्री पुढे म्हणाले की, हा फक्त ट्रेलर होता. गरज पडल्यास पाकिस्तानला संपूर्ण चित्रपटही दाखवू. 

Related Articles

Back to top button