क्राईम
लग्नाच्या चार दिवस आधीच नववधूचा मृत्यू

लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या २० वर्षीय नववधू सुषमा श्रीमंत जाधव हिचा लग्नाच्या अवघ्या चार दिवस आधीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अहमदपूर तालुक्यातील हिप्पळगाव येथील तिच्या राहत्या घरी घराच्या स्वच्छतेदरम्यान विद्युत शॉक लागल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
सुषमाचा विवाह २० मे रोजी येलदरा (ता. जळकोट) येथील सुनील सूर्यवंशी यांच्याशी होणार होता. घरात लग्नाची लगबग, पाहुण्यांची वर्दळ सुरू होती. दुपारी सुषमा घर साफ करत असताना कुलरची पिन लावत होती. त्याचवेळी तिला विद्युत प्रवाहाचा शॉक लागला. त्यातच तिचा मृत्यू झाला.



