- ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पाकिस्तानी हल्ल्यांना इतके चोख प्रत्युत्तर दिले आहे की, पाकिस्तानला त्याचे दुःख विसरता आले नाही. पाकिस्तानी नेत्यांना भारताच्या हल्ल्याची भीती ही नेहमीच असते.
- त्याचवेळी पाकिस्तानी नेत्यांना भारताकडून आणखी हल्ल्यांची भीती वाटू लागली आहे. युद्धबंदीनंतरही पाकिस्तानी नेते म्हणत आहेत की, भारत पुन्हा पाकिस्तानवर हल्ला करेल. अशा विधानांवरून हे समजते की, युद्धबंदीनंतरही पाकिस्तानमध्ये भारताची भीती कायम आहे.
- एका टीव्ही कार्यक्रमात अवामी मुस्लिम लीगचे प्रमुख आणि माजी मंत्री नदीम मलिक म्हणाले की, मे महिना हा एक महत्त्वाचा महिना असेल, विशेषतः पुढील 17 दिवस. कारण युद्धबंदी जाहीर करूनही तणाव जास्त आहे. 17 दिवसांत भारत पुन्हा पाकिस्तानचा तणाव वाढवू शकतो आणि हल्ला करू शकतो. युद्ध अजून संपलेले नाही, असे ते म्हणाले.
भारत- पाकिस्तान युद्ध पुन्हा पेटणार?
