- बलुचिस्तानमधील स्वातंत्र्याच्या लढ्याला नवसंजीवनी देणारी एक मोठी घटना समोर आली आहे. बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानविरोधात एकाच वेळी क्वेट्टा आणि मास्तुंग येथे मोठे हल्ले करून पाकिस्तान सरकारला थेट आव्हान दिले आहे.
- यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे जवान आणि त्यांचे सहकारी लक्ष्य करण्यात आले असून या कारवायांना ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे.
- क्वेट्टामध्ये पाकिस्तान सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या तथाकथित विजय दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मुनीर मेंगल रोडवर ग्रेनेड हल्ला झाला. हा कार्यक्रम खासदार अली मदाद जट्टक यांच्या नेतृत्वाखाली लष्कराच्या संरक्षणाखाली होत होता. या हल्ल्यामुळे एक एजंट ठार झाला असून,l १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला फक्त एक सुरक्षा अपयश नव्हता. तर बलुच लढ्याचे प्रतीकात्मक बंड होते. बलुचिस्तानने स्पष्ट केले आहे की, बलुचिस्तानवर पाकिस्तानचा कब्जा असलेल्या स्थितीत असे राष्ट्रीय उत्सव हे आमच्यासाठी अपमानास्पद आहेत आणि ते सहन केले जाणार नाहीत.
- क्वेट्टातील हल्ल्याच्या काही तासांनंतर मास्तुंगमधील एमसीसी क्रॉस येथे असलेल्या लष्करी चौकीवरही बलूचच्या जवानांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात चार पाकिस्तानी जवान जखमी झाले.
- दरम्यान या हल्ल्यांनंतर पाकिस्तान सरकारने तात्काळ प्रतिक्रिया दिली असून क्वेट्टामध्ये कठोर सुरक्षा उपाय लागू करण्यात आले आहेत. शहरात कंटेनर लावून नाकाबंदी करण्यात आली असून अनेक भागांत संचारबंदीचा अंमल आहे. सरकारने या कारवाया दहशतवादी हल्ले म्हणून घोषित केले आहेत.
जबरदस्त! आता बलुच आर्मीकडून ‘ऑपरेशन सिंदूर’
