- युग युद्धाचे नाही, पण हे युग दहशतवादाचेही नाही. दहशतवाद सहन केला जाणार नाही. पाकिस्तानी लष्कर आणि सरकार ज्या प्रकारे दहशतवादाला खतपाणी देत आहेत, ते पाहाता एकेदिवशी दहशतवाद पाकिस्तानला संपवेन. पाकिस्तानला वाचायचे असेल तर त्यांनी दहशतवादाचे इन्फ्रास्ट्रक्चर संपवायला हवे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यांनी आज देशाला संबोधन केले. त्यामध्ये बोलत होते.
- भारतावर जर यापुढे दहशतवादी हल्ला झाला तर जशास तसे उत्तर दिले जाणार हे ऑपरेशन सिंदूरमुळे स्पष्ट झाले. यापुढे न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही. त्या धमकीच्या आडून दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना सोडणार नाही. दहशतवादी आणि त्यांना पोसणाऱ्यांना वेगवेगळ्या दृष्टीने पाहणार नाही. दोघांवरही कारवाई होणार, असेही मोदी यावेळी म्हणाले.
- भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही तुकड्या अलर्ट आहेत. सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकनंतर आता ऑपरेशन सिंदूर दहशतवाद्यांविरुद्ध भारताची नीती आहे. ऑपरेशन सिंदूरने एक नवी सीमारेषा आखली आहे. जर भारतावर हल्ला झाला तर जशास तसे उत्तर दिले जाईल. आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या अटी-शर्तींनीच उत्तर देणार, असेही मोदींनी स्पष्ट केले.
ब्रेकिंग! पाकिस्तानला शेवटची वॉर्निंग, भारतीय सैन्य काही दिवस…
