- पाकिस्तानातून एक बातमी आली आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने भारताला जाहीर पाठिंबा दिला आहे. स्वतंत्र बलुच राष्ट्रासाठी या आर्मीचे प्रयत्न आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून या बलुच भागातील नागरिकांच्या विशिष्ट मागण्या होत्या. पण पाक सरकारने त्यांच्या मागण्या तर मान्य केल्याच नाही. उलट तिथे अत्याचार सुरु केले. दरम्यान आता पुन्हा बलुचिस्तान देशाची निर्मिती करावी यासाठी लढा सुरु झाला आहे.
- यातच गेल्या काही काळात पाकिस्तानी रेल्वे बलुच आर्मीने हायजॅक केली होती, यानंतर पाकिस्तानचे सैनिकही या आर्मीने मारले होते. अशातच आता बलुचिस्तान मास्टर प्लॅन करत असल्याचे वृत्त आहे.
- पाकिस्तानविरोधी लढा लढणारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी युद्ध झाल्यास भारताला पाठिंबा देणार आहे, यासह पाकिस्तानी सैन्यांना मिळेल त्या मार्गाने अडचणीत आणण्याचे प्रयत्न ते करत आहेत.
- भारत आणि पाकिस्तान यांच्यात जर निर्णायक लढाई झाली तर बलुच आर्मी भारताला सहाय्य करेल. लढाईच्या स्थितीत ते पश्चिम सीमेवरून पाकिस्तानवर हल्ला करतील. भारताने लढाई केल्यास या कृतीचे आम्ही स्वागत करु आणि त्यांच्यासोबत लष्करी ताकद म्हणून उभे राहू, असेही बलुच आर्मीच्या वृत्तात म्हटले आहे.
ब्रेकिंग! पाकिस्तानचे तुकडे पाडणार, बलोच आर्मी अॅक्शन मोडवर
