- भारताने दहशतवादाविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये इस्त्रोचा ‘मास्टर’ प्लान समोर आला आहे. ज्यामुळे पाकिस्तानला घाम फुटला आहे. इंफाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या पाचव्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना इस्त्रोच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली आहे.
- देशातील नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी धोरणात्मक उद्देशाने किमान दहा उपग्रह अहोरात्र कार्यरत आहेत. तुम्हाला सगळ्यांना आपल्या शेजाऱ्यांबद्दल माहिती आहे. जर आपल्याला आपल्या देशाची सुरक्षा सुनिश्चित करायची असेल तर आपल्याला आपल्या उपग्रहांद्वारे सेवा द्यावी लागेल, असे इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी सांगितले.
- भारताचे दहा उपग्रह सध्या भारताच्या सागरी सुरक्षेच्या व सीमा सुरक्षेच्यादृष्टीने पाकिस्तानवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्याशिवाय भारताच्या सागरी किनाऱ्यावरही आपल्याला लक्ष ठेवावे लागणार आहे. यासाठी उपग्रह किंवा ड्रोन टेक्नॉलॉजी शिवाय हे शक्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
एकच नंबर! ऑपरेशन सिंदूरमध्ये इस्रोची एन्ट्री
