ब्रेकिंग! मोदी आज रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार

Admin
1 Min Read
  • ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता संपूर्ण देशाला संबोधित करणार आहेत. सध्याच्या युद्धजन्य काळात सगळीकडे अनिश्चिततेचे वातावरण आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव पूर्णपणे मिटलेला नाही. असे असतानाच आता पंतप्रधान मोदी आज देशाशी बातचित करणार असून यावेळी ते नेमकं काय बोलणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
  • दरम्यान जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आपला परदेश दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर मोदींनी देशात येऊन अनेक बैठका घेतल्या होत्या. केंद्रीय गृहराज्यमंत्री, संरक्षणंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, तिन्ही सेनादलाचे प्रमुख यांच्यासोबत मोदी यांच्या महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. या बैठकांत राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, भारताचे पाकिस्तानविरोधातील धोरण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच या बैठकांनंतरच भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवले. या सर्व घडामोडींनंतर आज पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार आहेत.
  • तत्पूर्वी मोदी यांच्या संबोधनाआधी गेल्या काही दिवसांत इंडियन आर्मीने पत्रकार परिषदा घेऊन ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती दिली आहे.
Share This Article