ब्रेकिंग! पाकिस्तानच्या पापाचा घडा भरला होता, म्हणूनच राबविले ‘ऑपरेशन सिंदूर’

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीवर आज पुन्हा एकदा इंडियन आर्मीच्यावतीने पत्रकार परिषद घेऊन सद्यस्थितीची माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेत एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे. म्हणून आम्ही प्रथम दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे योग्य मानले. म्हणून पाकिस्तानने ही लढाई स्वतःची लढाई बनवली, त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देणे आवश्यक होते. 7 मे रोजी आम्ही दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पाकिस्तानच्या पापाचा घडा भरला होता. आम्ही पाकिस्तानने पाठवलेले ड्रोन नष्ट केले.
आपल्या जुन्या शस्त्रांनी पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली. आकाश प्रणालीचा वापर करून, आम्ही पाकिस्तानने पाठवलेले ड्रोन नष्ट केले. एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, आम्ही पाकिस्तानच्या पीएल-15 क्षेपणास्त्र आणि चिनी ड्रोनना यशस्वीरित्या लक्ष्य केले. लेझर गनने पाकिस्तानी ड्रोनना लक्ष्य करण्यात आले. भारताच्या संरक्षण यंत्रणेत प्रवेश करणे अशक्य आहे. पाकिस्तानने डागलेले चिनी क्षेपणास्त्रही अयशस्वी झाले.