- पाकिस्तानने युद्धविरामाचा भंग केल्यानंतर भारतीय हवाईदलाने मोठी कारवाई केली आहे. त्याची घोषणा हवाई दलाच्या अधिकृत x हँडल वरून करण्यात आली आहे. देशाच्या उद्दिष्टांना सामोरे ठेवून ही कारवाई झाली आहे. त्याची माहिती सरकार योग्य ब्रीफिंग घेऊन देणार आहे. याबाबत लगेचच अंदाजबाजी न करता थोडा संयम बाळगावा, असे आवाहन हवाई दलाने केले आहे. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचे हवाई दलाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
- आतापर्यंत या ऑपरेशनमध्ये हवाई दलाने थेटपणे कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण पहिल्यांदाच याबाबतची घोषणा झाल्यामुळे मोठी कारवाई असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. ती नेमकी कारवाई काय झाली, कोठे झाली, कशाप्रकारे झाली? याकडे आता भारतीयांचे लक्ष लागले आहे. युद्धविराम स्वीकारला असल्याची घोषणा करणाऱ्या आणि प्रत्यक्षात त्याचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला या कारवाईतून मोठा धक्का दिला गेला असल्याचेही स्पष्ट होत आहे.
- भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामे अचूकता आणि व्यावसायिकतेने यशस्वीरित्या पार पाडली आहेत. ऑपरेशन राष्ट्रीय उद्दिष्टांशी सुसंगत, जाणीवपूर्वक आणि सावधगिरीने पार पाडण्यात आले. ऑपरेशन्स अजूनही सुरूच आहे. योग्य वेळी सविस्तर माहिती दिली जाईल. खोटी माहिती प्रसारित करण्यापासून नागरिकांना दूर राहण्याचे आवाहन भारतीय हवाई दलाने केले आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या DGMO यांचा उद्या संवाद होण्याच्या आधीच ही कारवाई झाली आहे.
ब्रेकिंग! ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच; नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
