हवामान
आनंदवार्ता! यंदाची ‘मान्सून एक्स्प्रेस’ सुस्साट

- राज्यातील कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन दिवस तर विदर्भात पाच दिवस मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर काही भागात गारांचा पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यातही पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचे असून शहर आणि घाट विभागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल.
- प्रशांत महासागरातील समुद्री पाण्याचे तापमान व तेथील हवेचे दाब व मान्सून आगमनासंबंधीच्या इतर पाच वातावरणीय घडामोडी पाहता मान्सून देशाच्या दक्षिण टोकावर म्हणजे केरळात त्याच्या सरासरी तारखेच्या चार दिवस अगोदर म्हणजे २७ मे रोजी दाखल होण्याची शक्यता निर्माण झाल्याची माहिती भारतीय हवामान खात्यातील निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे दिली.
- यावर्षी पुढील १५ दिवस म्हणजे २५ मेपर्यंत पूर्वमोसमी गडगडाटी अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे दिवसाचे कमाल तापमान त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालीच राहण्याची शक्यता असल्यामुळे दिवसाची उष्णता व रात्रीचा उकाडा महाराष्ट्रात विशेष जाणवणार नाही. त्यामुळे या वर्षीचा मे महिना आल्हाददायक जाईल, असे वाटते.



