- भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदी कराराची अचानक घोषणा झाल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही शेजारी देशांसोबत काम करण्याची ऑफर दिली आहे. केंद्र सरकारने काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, यावर भर दिला आहे. तसेच तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला विरोध केला आहे. ट्रम्प यांच्या ऑफरवर भारत सरकार काय प्रतिक्रिया देते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
- भारत आणि पाकिस्तान यांच्यात 86 तासांच्या संघर्षानंतर अखेर शस्त्रसंधी करण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या सहमतीनंतर याबद्दल घोषणा करण्यात आली होती. दरम्यान आता ट्रम्प यांनी काश्मीरसंदर्भात तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांसोबत काम करणार असल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत X हॅंडलवर लिहिले की, मला भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि दृढ नेतृत्वाचा खूप अभिमान आहे. कारण त्यांच्याकडे समजून घेण्याची ताकद, शहाणपण आणि संयम आहे. सध्याच्या आक्रमकतेला थांबवण्याची वेळ आली आहे.
भारत-पाक तणावात ट्रम्प तात्या ‘बिन बुलाए मेहमान’
