भारताच्या शत्रूची मोठी घोषणा!

Admin
1 Min Read
  • पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान तणाव वाढला आहे. दोन्ही बाजूने हवाई हल्ले करण्यात येत आहे. तर काल अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने युद्धबंदीसाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली होती. मात्र अवघ्या तीन तासांमध्ये पाकिस्तानकडून याचा उल्लंघन केल्याने भारताने देखील पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराला प्रत्युत्तर देण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली आहे. तर दुसरीकडे चीनने पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला आहे.
  • चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी सांगितले की, त्यांचा देश पाकिस्तानचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य राखण्यासाठी त्याच्यासोबत उभा राहील. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, वांग यी यांनी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी दूरध्वनीवरून झालेल्या चर्चेदरम्यान या गोष्टी सांगितल्या. यासोबतच त्यांनी पुष्टी केली की चीन, पाकिस्तानचा सदाबहार धोरणात्मक सहकारी भागीदार आणि कट्टर मित्र म्हणून पाकिस्तानचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य राखण्यासाठी त्याच्यासोबत खंबीरपणे उभा राहील.
Share This Article